इंदापुरात नदीजोड प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण 

इंदापुरात नदीजोड प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण 

नीरेतून भीमेत पाणी आणण्याच्या अडीच किलोमीटर बोगद्याचे काम यशस्वी 

भिगवण : तावशी ते डाळज क्र. 2 (ता. इंदापूर) या 24 किलोमीटर अंतरामध्ये राबविण्यात येत असलेल्या नीरा व भीमा नदी जोड प्रकल्पाच्या अकोले (ता. इंदापूर) येथे सुरू असलेल्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील नीरा व भीमा नद्यांना जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यात तावशी ते डाळज डाळज क्र. 2 या 24 किलोमीटर अंतरामध्ये नीरा नदीतून भीमा नदीच्या पात्रात जमिनी खालून बोगद्याद्वारे पाणी वाहून नेण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम सहा टप्प्यात करण्यात येत आहे. त्यातील अकोले येथे सुरू असलेल्या पहिल्या अडीच किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. 

जमिनीखाली सुमारे शंभर फुटांहून जास्त खोलीवर सुरू असलेले हे काम शासन, प्रशासन व कामगार यांच्यासाठी आवाहनात्मक होते. अकोले ते काझड येथील बोगदे एकमेकांना यशस्वीरीत्या एकमेकांना जोडण्यात आले. या कामाअंतर्गत जमिनीखाली 180 फूट खोलीवर आठ मीटर रुंदीचा बोगदा व अडीच किलोमीटर लांब, असे बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

"सोमा' कंपनीच्या वतीने हे काम करण्यात येत आहे. आत्तापर्यंत बोगद्याचे साडेनऊ किलोमीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याबद्दल प्रशासकीय अधिकारी, अभियंते व कामगार यांनी आनंद साजरा केला. एप्रिलअखेर कामाचा आणखी एक टप्पा पूर्ण होईल. 

याबाबत प्रकल्पाचे काम करणाऱ्या सोमा कंपनीच्या अधिकारी म्हणाले, ""जमिनीखाली सुमारे 180 फुटांवर हे काम करण्यात येत होते. या कामावर सुमारे एक हजार कामगार मागील दोन वर्षांपासून काम करत आहेत. या प्रकल्पातील सहा टप्प्यांपैकी अकोले येथील एका टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. एप्रिलअखेर दुसऱ्या टप्याचे काम पूर्ण होईल. काम पूर्ण झाल्याबद्दल समाधान आहे.'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com